Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शासकीय | मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

शासकीय | मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

मुलांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणारी इमारत : पालकमंत्री नितेश राणे


सिंधुदुर्ग: निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असल्याने ही इमारत अशा मुलांच्या आयष्यामध्ये परीवर्तन घडवून आणणारी एक वास्तू ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस सिंधुदुर्गगरी येथील शासकीय संस्थेची नूतन इमारत जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. या शासकीय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला व बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे, महिला व बाल विकास विभागीय उप आयुक्त सुवर्णा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ही इमारत जनतेच्या पैशातून उभी राहिली असल्याने येथील मुलांना अन्य मुलांप्रमाणे सोयी-सुविधा देणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. मुलांना मनोरंजानाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. विशेष म्हणजे आहार हा दर्जेदारच असला पाहिजे. आहाराच्या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मुलांच्या विकासासाठी प्राप्त झालेला निधी योग्य पध्दतीने खर्च झाला पाहिजे याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची राहिल. मी वारंवार या बालगृहाला भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.


जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, सर्व सोयी-सुविधांनी युक्त असणारी ही इमारत मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. निराधार आणि अनाथ मुलांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

rapan bottom