पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती
कुडाळ : श्री देव कलेश्वर मंदिर, नेरुर येथे सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची अभंग व शास्त्रीय संगीताची सुरेल मैफिल १३ एप्रिल रोजी ठीक सायंकाळी 5:45 वाजता होणार आहे. प्रथम मानकरी श्री मतकरी कुटुंबीय, शिरसोसवाडी यांच्या वसंत पूजे निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ढोल तशा मिरवणूक व पूजा समाप्ती नंतर फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय पालक मंत्री नितेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

