Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा बिल्डरला दणका

तब्बल नऊ वर्षांनी फ्लॅटधारकला व्याजासह मिळाले 26 लाख

विधिज्ञ संजय रानडे यांनी पाहिले काम

निलेश जोशी | कुडाळ : सदनिका खरेदी व्यवहारात फसवणुक करणाऱ्या कणकवली येथील बिल्डरला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. आयोगाने बिल्डरला दिलेल्या आदेशामुळे ग्राहक योगेश गणेश ढवण यांना व्याजासह २६ लाख रुपये भरपाई मिळाली आहे. या प्रकरणी विधिज्ञ संजय रानडे यांनी काम पाहिले.
सदर प्रकरणाची वस्तूस्थिती अशी कि, श्री.योगेश गणेश ढवण, रा. हरकुळ (बु.) ता. कणकवली यांनी कणकवली येथील एका बिल्डर कडून साठेखताने एक सदनिका दि.१५.०१.२०१६ रोजी खरेदी केलेली होती. त्यासाठी त्यांनी बिल्डर यांना रक्कम रू. १५,९३,५००/- दिलेले होते. परंतु विल्डर ने ग्राहक श्री. ढवण यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा वेळीच दिलेला नव्हता. सदर प्रकरणांत ग्राहक म्हणून श्री. ढवण यांची पूर्णतः फसवणूक झालेली होती. श्री. ढवण यांचेकडे पैसाही नाही आणि सदनिकाही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तसेच श्री. ढवण यांनी बँक कर्ज सदनिका खरेदीसाठी घेतलेले असल्याने त्याचे हफ्ते मात्र व्याजासह भरावे लागत होते. त्यामुळे श्री ढवण हे याप्रकरणात पूर्ण कर्जबाजारी झालेले होते. ग्राहक श्री. ढवण यांनी या संदर्भात ग्राहक फसवणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दि. ०७.१२.२०१६ रोजी ग्राहक तक्रार दाखल केलेली होती.
सदर ग्राहक तक्रारीमध्ये जिल्हा ग्राहक आयोगाने दि. २६.०९.२०१७ रोजी ग्राहक श्री. ढवण यांचे बाजुने त्यांची संपूर्ण रक्कम व्याज व नुकसान भरपाईसह देणे बाबत बिल्डर यांना आदेश केलेला होता.


सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचा सदर प्रकरणी आदेश होवूनही बिल्डर सदर आदेशाची अंमलबजावणी करत नव्हते. सदर प्रकरणी बिल्डर हे ग्राहकाबरोबरच आयोगाची सुध्दा फसवणूक तसेच दिशाभूल करणेचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ग्राहक श्री. योगेश गणेश ढवण यांनी सदर प्रकरणाची अंमलबजावणी होणेसाठी दरखास्त अर्ज ग्राहक संरक्षण अधि. २०१९ चे कलम ७१ आणि कलम ७२ नुसार सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल केला. त्यालाही बिल्डर दाद देत नव्हता. सदर प्रकरणात बिल्डरना पोलिसांमार्फत अटक करून मे. आयोगासमोर हजर करणेत आले. त्यानंतर मे. आयोगाने ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ७१ आणि कलम ७२ चे सर्व तरतुदींचा तसेच अधिकाराचा वापर करून विरूध्दपक्ष, बिल्डर यांना पूर्ण संधी देवून अंतिमतः सदर प्रकरणात बिल्डर यांना मे. आयोगाकडून ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे तरतुदी नुसार शिक्षा आणि दंड होणार होता. अशावेळी ग्राहक आयोगाने ग्राहकाची संपूर्ण रक्कम व्याज व नुकसान भरपाईसह तात्काळ ग्राहक श्री. योगेश गणेश ढवण, यांना आदा करणेबाबत अंतिम संधी विरूध्दपक्ष बिल्डर यांना दिली.


आरोपी तथा विरूध्दपक्ष बिल्डर यांनी सदर प्रकरणी ग्राहक श्री. योगेश गणेश ढवण यांची फसवणूक झालेली रक्कम व्याज नुकसानभरपाईसह रक्कम रू.२६,००,०००/- (रू. सव्वीस लाख मात्र) प्रकरण अंतिम टप्प्यामध्ये असताना ग्राहक श्री. ढवण यांना बँक ट्रान्सफरने (RTGS) दि.०७.०४.२०२५ रोजी अदा केलेले आहेत.


श्री. योगेश गणेश ढवण यांची ग्राहक फसवणूकीतील संपूर्ण रक्कम रू. सव्वीस लाख मात्र ही सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे मार्फत कायदयाच्या सर्व तरतुदींचा वापर करून वसुल करून मिळाली आहे. सदर प्रकरणांस एकूण नऊ वर्षाचा कालावधी लागला आहे. ग्राहक श्री. योगेश गणेश ढवण यांना या वसुलीमुळे मे. ग्राहक आयोगाकडून योग्य न्याय मिळाला आहे. सदरचे प्रकरण सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाचे अध्यक्ष, श्रीमती इंदुमती मलुष्टे आणि सदस्य, श्री. योगेश खाडिलकर यांचेसमोर सुरू आहे. सदरप्रकरणी ग्राहक श्री. योगेश गणेश ढवण यांचेसाठी विधीज्ञ श्री. संजय यशवंत रानडे यांनी काम पाहिले.

rapan bottom