Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

श्रीम. मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार

श्रीम. मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार

रामनवमी उत्सवात विविध उपक्रम

निलेश जोशी | कुडाळ : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमीचे औचित्य साधून वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल, व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई, या संस्थांच्या विद्यमाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रामनवमी व एकादशी या दोन दिवशी येणाऱ्या भाविकांना संस्थामार्फत मोफत सरबत वाटपाचा कार्यक्रमही पार पडला.
मोफत सरबत वाटप स्टॉलला आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक,एड. संग्राम देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तात्कालीन मंत्री दिग्विजय खानोलकर यांचे चिरंजीव विश्वविजय, संजय पडते, पत्रकार राजेश कोचरेकर व अन्य मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.


1999 पासून गेली 26 वर्षे रामनवमीचे औचित्य साधून हे उपक्रम घेतले जातात. यावर्षी जिल्ह्यातील सहा मान्यवर व भजन मंडळ आणि कबड्डी संघ यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, निवती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी भिमराव गायकवाड, संस्था सचिव संदीप साळस्कर, वालावल गावचे सरपंच राजेश प्रभू यांचे हस्ते, साईनाथ दळवी, माधुरी खराडे, श्रुतिका मोर्ये, योगेश प्रभू, विजय तुळसकर, डॉ. दिपाली काजरेकर, लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल, व लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


यावेळी दत्ता सामंत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देताना, संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांचा शिवसेनेच्या स्थापनेपासून सन 2005 पर्यंतच्या कार्याचा उलगडा केला. लेखणीच्या माध्यमातून प्रशासनावर असणारी त्यांची पकड, याचा हात कोणीही धरु शकणार नाहीत. त्यांच्या या अभ्यासपूर्वक ज्ञानाचा फायदा पक्षास व्हावा याकरीता आम्ही त्यांचा पक्षात योग्य सन्मान करणार आहोत. गावाने त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून घेतल्यास गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. गायकवाड यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देताना भविष्यातही आपण अशीच प्रगती करावी याकरता प्रोत्साहित केलं. संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी गेल्या 25 वर्षात संस्था मार्फत केलेल्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. सरपंच राजेश प्रभू यांनीही संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचा येथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी संस्थेमार्फत शारदा विद्यालय डीगस येथील बाल कलाकारांचा मधु कैठभ हा दशावतार प्रयोग करण्यात आला. प्रेक्षकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता बालकलाकार विजय तुळसकर यांच्या विविध प्रकारे हार्मोनियम वाजविण्याच्या कलेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संदीप साळसकर यांनी केले तर सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

rapan bottom