निलेश जोशी | कुडाळ : कुडाळच्या बाजाराच्या दिवशी आठवडा बाजार असताना बेदरकार (भरधाव वेगाने) डंपर चालवल्या प्रकरणी चार डंपर चालकांवर कुडाळ पोलिसांनी 281 प्रमाणे कारवाई केली.
याप्रकरणी चालक शुभम हर्षलाल तिवारी (30, रा साखळी गोवा मूळ राहणार मध्य प्रदेश), दावल नबीसाब शेख (55, राहणार चौके, मूळ राहणार चंदगड), गंगाराम उत्तम परब (44) आणि हितेश लक्ष्मण मुळगावकर या चौघांवर 281 प्रमाणे कारवाई करण्यात आली. अमोल बंडगर, ज्योती पांडुरंग रायशिरोडकर, मेघ:श्याम भगत यांनी फिर्याद दिली.

