निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहरातील एका बियर शॉपीच्या पलीकडील झाडाच्या आडोशाला मंगळवारी मध्यरात्रीनंतर अंधारात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना दोघा युवकांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारक परिणाम पदार्थ अधिनियम कलम 8 (c) 27 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई योगेश मांजरेकर यांनी तक्रार दिली. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ शहरात गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन वाढले असून कुडाळमध्ये विक्री होत असल्याच्या घटना पुढे येत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मंगळवारी पोलिसांनी दोघा युवकांना संशयास्पद रित्या वावरत असताना ताब्यात घेतले. त्यांनी गांजा सेवन केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. गांजा सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून चौकशी डीडी माने करीत आहेत.

