Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजच्या अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के

बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजच्या अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या सिंधुदूर्ग जिल्ह्यात सर्वात प्रथम स्थापन झालेल्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला.
अंतिम वर्ष फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये कु. मिताली मिलींद शिवलकर (70.87 टक्के) प्रथम, कु. मृण्मयी शशिकांत खानोलकर (70.12 टक्के) द्वितीय, तर कु. शुभांगी विलास लोहार (66.87 टक्के) ने तृतीय येण्याचा मान मिळविला.


या सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे आरोग्यम् क्लिनीक (पिंगुळी), यशवंतराव ग्रामीण रुग्णालय ॲन्ड रिसर्च सेंटर, नेरुर, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळ तसेच नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई यांसारख्या नामांकित हॉस्पिटलमधून आपले प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच इंटर्नशिपसाठी हे विद्यार्थी उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सांगली या हॉस्पिटलमध्ये जात आहेत. आंतरवासीतासाठी डॉ. संजय ओक, डॉ. अमेय देसाई आणि डॉ. ममता बियानी यांचे सहकार्य लाभले.


या सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, प्रा. डॉ. सुरज शुक्ला, डॉ. ज्योतीरंजन पलटासिंग, डॉ. वरद गावडे, डॉ. मनाली जाधव, डॉ. पदम्श्री चौधरी आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थींनीचे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर यांनी अभिनंदन केले आहे

rapan bottom