Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळमध्ये उद्या लघू-सुक्ष उद्योजकांसाठी कार्यशाळा

निलेश जोशी | कुडाळ : रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया व कुडाळ एम.आय.डी.सी. इंन्डस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्धी मार्गदर्शन व सहकार्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० एप्रिल २०२५, सकाळी ११.३० वाजता विज कामगार भवन, नंदनवन पार्क, मधुरा आर्केड जवळ, कुडाळ-पिंगुळी येथे ही कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष राणे, समन्वयक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी केले आहे.


ग्रामीण भागातील लहान व मोठे व्यावसायिक एकत्रित येऊन संयुक्तिक बाजार पेठ निर्माण करण्याकरिता रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चळवळ सुरु करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या दृष्ट्रीने जिल्ह्यातील सुक्ष्म उद्योजकांना नव तंत्रज्ञान व बाजारपेठेशी जोडण्याच्या दृष्ट्रीने विशेष मार्गदर्शन कार्यशाळा मा. श्री. अतुल घुईखेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० एप्रिल २०२५, वेळ : सकाळी ११.३० वाजता विज कामगार भवन, नंदनवन पार्क, मधुरा आर्केड जवळ, कुडाळ-पिंगुळी रोड, पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ४१६५२८ येथे आयोजित करण्यात आले आहे.


या कार्यशाळेसाठी श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर, कोकण विभाग, बाळासाहेब पाटील, संचालक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, विनोद मर्गज, संचालक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, संतोष टाले, कार्यकारी संचालक, कुसुम राम अॅग्रो प्रोसेसिंग इंन्डस्ट्रीज, शेगाव, जि. बुलढाणा, चेतन पवार, कार्यकारी संचालक, ऑलीगन इंन्डस्ट्रिज, नाशिक, जयंत पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीया, प्रज्ञात दिवेदी, कार्यकारी संचालक, ई-व्हिकल अल्बेडो व्हिजन प्रा.लि. मुंबई, शिवाजी देशमुख, कार्यकारी संचालक, शिवांजली हेअर आईल, वाशिम, उत्तमराव शिंदे, सेंद्रीय शेती तज्ञ, संभाजी नगर, झेड. के. जारवाल, सेंद्रीय शेती तज्ञ, संभाजी नगर आदी नामवंत क्षेत्रातील उद्योजक व विविध कंपनीचे संचालक यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार असून, योग्य इच्छुक लाभार्थ्यांना डीलरशीप मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संतोष राणे, समन्वयक, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी केले आहे

rapan bottom