वेंगुर्ला : वायंगणी-डोंबवाडी येथील श्री देव डोंब मंदिर येथे १६ ते १८ एप्रिल कालावधीत श्री देव डोंब विकास मंडळ वायंगणी-डोंबवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव डोंब देवस्थान वायंगणीच्या रंगमंचावर नाट्य महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात बुधवार १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, वालावल यांचा 'ययाती देवयानी' नाट्यप्रयोग, गुरुवार १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा 'राजा गोपीचंद' हा नाट्यप्रयोग, शुक्रवार १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्री खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा 'वेडी विजया' हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव डोंब विकास मंडळ, वायंगणी-डोंबवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

वेंगुर्ला - वायंगणी येथे १६ ते १८ एप्रिल रोजी दशावतार नाट्य महोत्सव
