संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले
मालवण : देवली येथे अवैध वाळू उपसा व डंपरमधून वाळू वाहतूक केल्याच्या आरोपातून प्रभाकर लालु राठोड, वय 35 राह. कुडाळ, महेश तुकाराम शिरसाट, वय 50 राह. कुडाळ, आत्माराम जयवंत चव्हाण, वय 35 यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.
22 एप्रिल 2020 रोजी रात्री 10:45 च्या सुमारास मंडळ अधिकारी मालवण यांचे मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करीत देवली काळेथर पुलाच्या नजीक आले असता त्यांना देवली गव्हाणवाडीकडून येणा-या डंपरमध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यामुळे मंडळ अधिका-यांनी मालवण पोलिस ठाण्यात डंपर चालक व मालक यांचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 269,379, 34 अन्वये वाळूचोरीची फिर्याद दाखल केली. त्यानंतर तपासकामादरम्याने ज्या ठिकाणाहून वाळू भरुन दिली त्या इसमालाही पोलिसांनी आरोपी केले. तपासकाम पूर्ण करून मालवण पोलीसांनी आरोपींविरुद्ध मे. मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
याकामी सुनावणी दरम्यान सरकारपक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपींतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपीची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली

