कुडाळ : आंदुर्ले-माईनवाडा येथील श्री देव मारुती मंदिरात १० ते १३ एप्रिल या कालावधीत श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रोज सकाळी आठ वाजता श्रींची नित्य पूजा, सायंकाळी ७ वाजता धुपारती, ७.३० वाजता भजन, रात्री ८.३० वाजता श्रीमद ग्रंथराज दासबोध वाचन, ९ वाजता कीर्तन होणार आहे. १० एप्रिलला रात्री आठ वाजता श्री भूतनाथ मंडळ यांचे भजन, ११ रोजी रात्री आठ वाजता श्री गजानन मंडळ यांचे भजन, नऊ वाजता कीर्तनकार-चिंतामणी सामंत (शेळपी) यांचे कीर्तन, १२ रोजी हनुमान जयंती, पहाटे ५ वाजता कीर्तनकार-अवधूत नाईक (वायंगणी) यांचे हनुमान जन्मोत्सवावर आधारित कीर्तन, सकाळी ६.१५ वाजता हनुमान जन्मोत्सव, आठ वाजता विलास रेवंडकर व सहकारी यांचा हरिपाठ, १० वाजता भिक्षाफेरी, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, आरती, सायंकाळी ५ वाजता वसंतपूजा, ६ वाजता स्थानिक भक्तमंडळी यांचे भजन, ७वाजता धुपारती, रात्री ८ वाजता श्रीमद ग्रंथराज दासबोध वाचन, ९ वाजता कीर्तनकार-दिनकर प्रभू केळुसकर यांचे कीर्तन, १३ रोजी पहाटे ५ वाजता मकरंद देसाई (तेंडोली) यांचे कीर्तन होणार आहे.

