Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळात गळफास घेऊन पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

कुडाळात गळफास घेऊन पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (वय ३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दुपारी पावणेचार पूर्वीची हि घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळ मधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते. आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईल वर त्यांनी 'तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे' अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॅच लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.


सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सूरज हे मळगाव-कुम्भार्लीवाडी येथील मूळ रहिवाशी होते. त्यांच्या त्या घरी आई, भाऊ, वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे. तर त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. सुरज पवार यांच्या या जाण्याने कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यानी हळहळ व्यक्त केली. पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. कांबळे यांनी सुद्धा याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीने भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपस पीएसआय श्री. माने करत आहेत.

rapan bottom