Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

MLA nilesh rane | मालवण-कुडाळ तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

MLA nilesh rane | मालवण-कुडाळ तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्न

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या ८० लाख रुपये निधीतील एकूण ११ कामांना
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध करून देत मतदारसंघात अत्यंत महत्वाच्या आणि अनेक वर्षाची मागणी आलेल्या कामांसाठी मंजुरी दिली आहे.

या कामांमध्ये नांदोस गिरेश्वर मंदिर ते लिंगेश्वर मंदिर रस्त्यावर एलटी लाईन थ्री फेस करणे, नेरूर कुलस्वामिनी मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, पावशी सिमावाडी कुंभार वाडी येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविणे, माड्याचीवाडी (मडगाव) पोलीस चेक पोस्ट नजीक ट्रान्सफॉर्मर बसविणे, वेताळ बांबार्डे पावणाईटेंब सावंत पार्क १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर करणे, आंबेरी माणगाव मडाचा उंचावला गावातील खराब झालेल्या ११ केव्ही लाईनची बदली व दुरुस्ती करणे, जांभवडे कुंभारवाडी व भंडारवाडी येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर व ११ केव्ही लाईन करणे, झाराप मुंडयेवादी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, निरुखे नाईकवाडी येथे थ्रि फेस लाईन करणे. या कामांचा समावेश आहे.

पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार असून अत्यंत तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे नांदोस, नेरूर, पावशी, माड्याचीवाडी, आंबेरी, जांभवडे, वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

rapan bottom