Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दरबार रामेश्वराचा सोहळा राम जन्माचा…!

दरबार रामेश्वराचा सोहळा राम जन्माचा…!

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा येथील शाही संस्थानी थाटातील रामजन्मोत्सव सोहळा

हजारो भावीकांची उपस्थिती : रामनामाने आसमंत दुमदुमला : देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन

मालवण : तोफा दणाणल्या…. बंदूकीच्या फैरी आकाशात झडल्या…. मंगल वाद्ये वाजू लागली…. नगरखान्यात नगारे-ताशे धडाडले. आचरानगरीत रामनामाने आसमंत दुमदुमला. रामजन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागते. संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला.

मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थाच्या ललकारी बरोबर तोफा कडाडल्या, नगारे  धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन आदर्शवत ठरले. सोबतच आचरा ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस, प्रशासन यांसह सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असते.

इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. आचरा पंचक्रोशी पूर्णपणे 12
दिवस रामनामात दंग होते. भक्तांच्या गराड्यात आचऱ्यात सांब सदाशिव दंग झाला होता. इनामदार श्री देव रामेश्वराच्या पुरातन मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत 'राम जन्मला गं सखी राम जन्मला जयघोष सुरू झाला. वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्म प्रसंगी गुलाल, अक्षतांची उधळण झाली. या क्षणांची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती हजारो भाविकांनी घेतली. रामनवमी उत्सव आचरा रामेश्वर संस्थानसह संपूर्ण जिल्हयात साजरा करण्यात आला. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी श्रींची पंचारतीसह महालदार,चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी रामनामाची गीते सादर करण्यात आली.

गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा रामजन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी तसेच अन्य प्रांतातून आलेले भाविक सहभागी झाले होते.

रामजन्मानंतर उपस्थित सर्व जनता रामेश्वर संस्थानने केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाच्या पंगतीस जात-पात, धर्माचा विचार न करता, एकाच पंगतीत सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांच्या शेजारी बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीचा आशीर्वाद व महाप्रसादाचे सेवन करून प्रत्येकजण जीवन सार्थक झाल्याच्या भावनेतून परतत असतो संगीताच्या मेजवानीचा रामन्मानंतर सायंकाळी नागरिकांनी आनंद लुटला. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा व आचरा  पोलीस ठाण्याचा कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

श्री देव रामेश्वर मंदिरात रामजन्म सोहळा निमित्ताने मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांचा सोबत मंडळ अधिकारी अजय परब उपस्थित होते.

रामनवमी च्या दिवशी सायंकाळी ६ वा. गायक श्री. समीर अभ्यकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे,तबला साथ- श्री. रामकृष्ण करंबेळकर. यांचे गायन झाले. गायना त आचरावासियं मंत्र मुग्ध झाले होते.

अमित खोत | मालवण

rapan bottom