निलेश जोशी | कुडाळ : STS अर्थात सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, माजगाव नं ५ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. इयत्ता ३री तील ४ पैकी ३ विद्यार्थी मेडलधारक ठरले आहेत.
एसटीएस परीक्षेत सार्थक प्रसाद धुरी यास १४४ गुण सिल्व्हर मेडल, आर्या संदिप गावडे - १२६ गुण ब्रॉंझ मेडल, सिया संजय राणे - १२४ गुण ब्रॉंझ मेडल, तसेच पार्थ लक्ष्मण गावडे, सान्वी शिवदास चौगुले, श्रीयांत लाडू निचम या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती प्राची दळवी , उपशिक्षिका श्रीमती मिनल पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम शितल निचम, उपाध्यक्षा पवित्रा धुरी उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती प्राची दळवी , उपशिक्षिका श्रीमती मिनल पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

एसटीएस परीक्षेत माजगाव शाळा नं. ५ चे घवघवीत यश
