Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आचरा-कोल्हापूर, आचरा-बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी

आचरा-कोल्हापूर, आचरा-बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मालवण आगार व्यवस्थापक यांना निवेदन

मालवण | प्रतिनिधी : कणकवली बस डेपोची काही वर्षांपूर्वी सुरू असलेली आचरा-बोरिवली तसेच आचरा-कोल्हापूर बसफेरी बंद करण्यात आली आहे. प्रवासी वर्गाचा विचार करता पुन्हा दोन्ही बसफेऱ्या सुरु कराव्यात. या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना देण्यात आले.

दरम्यान मालवण आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत तसेच ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याची सविस्तर माहिती द्यावी. आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यात येतील असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

तालुक्यातील आचरा येथून कणकवली डेपोची आचरा - बोरिवली बसफेरी काही वर्षापूर्वी सुरू होती. ती बंद केल्याने प्रवाशांना मुंबई कडे जाताना अन्य गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात खासगी गाड्यांमधून प्रवास करणे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे आचरा - बोरिवली बसफेरी सुरू झाल्यास आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब या ठिकाणच्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर आचरा - कोल्हापूर ही बसफेरीही सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मनोज हडकर, जयप्रकाश परुळेकर, अजित घाडी, पंकज आचरेकर यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom