अपघातात कार मधील विद्यार्थीनी जखमी
निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पावशी बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालक मिलिंद साहेबराव कोळी (वय ३४, सध्या रा. कुडाळ एसटी डेपो, मूळ रा. सांगवी खुर्द, ता. यावल, जि. जळगाव) यांच्यावर आज सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार चालक केशव श्रीधर सरवटे (वय ५६, रा. वारंगाची तुळसुली, ता. कुडाळ) यांनी तक्रार दिली आहे.
केशव सरवटे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, ते त्यांची मारुती बॅगनार गाडी (MH 07 AG -3710) घेऊन आज दिनांक 03/04/2025 रोजी सकाळी 06.35 वा.चे मानाने त्यांच्या मुलीला कसाल येथील कॉलेजमध्ये सोडण्यासाठी घरातुन निघाले. ते वॅगनार गाडी चालवित घेऊन घावनळे कुडाळ रोड ने जात असताना वैगनार गाडी पावशी बेलनदी वाडी येथील तेली यांचे घरासमोरील रोडवरील वळणावर आली असता माझ्या वॅगनार गाडीचे समोरुन कुडाळ ते बामणादेवी एस.टी.बस (क्र. MH-20-BL-2467) वरील चालकाने आपल्या ताब्यातील एस टी बस भरधाव वेगात चालवुन सकाळी 06.45 वा.चे मानाने माझी वॅगनार गाडी क्र. MH 07-AG-3710 हिला माझ्या उजव्या बाजुने ड्रायव्हर साईडने समोरुन धडक देऊन अपघात केला. सदर अपघातानंतर वॅगनार गाडी रस्त्यावरच एस.टी. बस समोर आडवी होऊन बंद पडली. सदर अपघातात श्री सरवटे यांच्या बाजुस बसलेली त्यांच्या मुलीचे तोंड गाडीच्या डॅशबोर्डला आपटल्याने तिचे तोंडातील दातांना मार लागुन दुखापत झाली. तसेच वॅगनार गाडीच्या समोरील बंपर, लोअर ग्रिल, अप्पर ग्रिल, फाँग लॅम्प, उजव्या साईडचे फेंडर, बोनेट, उजव्या बाजुची हेडलाईट, आतील हुक लॉक चेंबर, उजव्या बाजुचे ऑफरॉन इत्यादीचे तुटुन फुटुन नुकसान झाले व एस.टी.चे समोरील उजव्या साईडचे पॅनल तसेच त्याखालील बंपर तुटुन व फुटुन नुकसान झालेले आहे.
अपघात घडल्यानंतर कुडाळ एस टी डेपोतुन एस टीचे अधिकारी आल्यानंतर त्यांचेकडुन गाडीस धडक देणा-या एस.टी. बस चालकाचे नाव मिलिंद साहेबराव कोळी वय 34 सध्या रा. कुडाळ एस.टी. डेपो मुळ रा. सांगवी खुर्द, ता. यावल, जि. जळगाव असे असल्याचे समजलेले आहे.
सदर एसटी बस चालकाने आपल्या ताब्यातील एस टी बस भरधाव वेगात हयगयीने चालवुन, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कारला उजव्या बाजुने ड्रायव्हर साईडने समोरुन धडक देऊन अपघात करुन मुलीच्या दुखापतीस व दोन्ही गाड्यांच्या नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन श्री। सरवटे यांनी सदर बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या प्रमाणे त्या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार-एसटी बस अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल
