नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
मालवण | प्रतिनिधी : मालवण राजकोट येथे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरु आहे. यापैकी काही ठिकाणी काम योग्य दर्जाचे होत नाही अश्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी स्थानिक नागरिक व पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, उद्योजक सतीश आचरेकर, संतोष खंदारे, श्री. खंदारे, श्री. राणे, शिवसेना शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, मंदार लुडबे, संदीप भोजने, ऋषिकेश सामंत, कोदे यांसह अन्य पदाधिकारी तसेच अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

