सिंधुदुर्ग : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत यांची,सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री पदी आज मंगळवार दिनांक 04.03.2025. रोजी निवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर खालील नमूद शिवसेना पक्षाच्या सन्माननीय मंत्री महोदयांना, यांना शिवसेना पक्षवाढीसाठी खालील नमूद जिल्ह्यांची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.
शिवसेना संपर्क मंत्री श्री. गुलाबराव पाटील परभणी, बुलढाणा, श्री. उदय सामंत. मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग, शंभूराजे देसाई, सांगली, नगर, संजय राठोड. नागपूर, चंद्रपूर, अमरावती , दादाजी भुसे धुळे, नंदुरबार, प्रताप सरनाईक, पालघर, सोलापूर, भरतशेठ गोगावले. हिंगोली, वाशीम, संजय शिरसाट बीड, नांदेड, प्रकाश आबीटकर अकोला, लातूर, आशिष जैस्वाल भंडारा, गोंदिया, योगेश कदम, जालना यांना जबाबदारी देण्यात आली.

