Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मसुरे डांगमोडे येथे 8 मार्च रोजी महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा

मसुरे डांगमोडे येथे 8 मार्च रोजी महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा

मसुरे | प्रतिनिधी : नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि.8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. या वेळी विजेत्या पुरुष गटासाठी प्रथम क्रमांक 7000 व चषक, द्वितीय क्रमांक 5000 व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी 500 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर महिला गटासाठी प्रथम क्रमांक 7000 व चषक, द्वितीय क्रमांक 5000 व चषक तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ठ पकड व अष्टपैलू खेळाडू यांना प्रत्येकी 500 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू आणि सहभागी कबड्डी हितचिंतक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी नितीन हडकर मो. 7249357239, दत्तप्रसाद पेडणेकर मो.9421145827 यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom