Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ तहसीलदार यांचा तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत

कुडाळ तहसीलदार यांचा तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत

मनसेने केले तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे अभिनंदन

शासनाच्या इतर विभागानी अनुकरण करण्याची अपेक्षा

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याची दखल घेत, तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शासनाच्या इतर विभागांनी सुद्धा याचे अनुकरण करावे अशा अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.


कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या संकल्पनेतून तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सूचना / तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. लोकांनी सूचना किंवा तक्रारी यामध्ये लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांकरिता येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येतात, उदा. शासकीय, शालेय कामांचे विविध दाखले, महसुल सबंधीत कामे, विविध शासकीय योजना करिता लागणारी कागद पत्रे अशात अनेकदा प्रशासकीय कर्मचारी किंवा नेटवर्क अडथळा यामुळे नागरिकांच्या अनेक खेपा होतात. अशावर नियंत्रण आणणे आणि कारभार पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने कुडाळ तहसीलदार यांनी सूचनापेटी लावण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. अशाच प्रकारे शासनाच्या इतरही विभाग प्रमुखांनी आपआपल्या कार्यालयांमध्ये सूचना/तक्रार पेटी जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्यास . जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामात होणाऱ्या अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊन त्यावर योग्य कार्यवाही करणे सोपे जाईल.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत तहसीलदार वीरसिंग वसावे यांना पुष्पगुच्छ देऊन या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom