Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण मध्ये ९ मार्च रोजी 'मिनी मॅरेथॉन स्पर्धा'

मालवण मध्ये ९ मार्च रोजी 'मिनी मॅरेथॉन स्पर्धा'

ग्लोबल रक्तदाते आणि ग्लोबल रक्तवीरांगणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

मालवण : येथील ग्लोबल रक्तदाते आणि ग्लोबल रक्तवीरांगणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२५ रन फॉर हेल्थचे आयोजन करण्यात आले आहे.


'चला जाऊया रक्तदान जनजागृतीसाठी, चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी, चल सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी' या थीमखाली ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सहा गटांमध्ये होईल. पहिला गट १० ते १५ वर्षे २ किलोमीटर, दुसरा गट १६ ते २५ वर्षे २ किलोमीटर, तिसरा गट २६ ते ३५ वर्षे २ किलोमीटर, चौथा गट ३६ ते ४५ वर्षे २ किलोमीटर, पाचवा गट ४६ ते ५५ वर्षे चालणे, धावणे यात ग्राह्य असेल. २ किलोमीटर, सहावा गट ५६ वर्षापुढील महिला चालणे, धावणे २ किलोमीटर.


स्पर्धा रविवारी सकाळी ७ वाजता होणार आहे. मॅरेथॉनचा मार्ग देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पूल सागरी महामार्ग असा असेल. सहभागी स्पर्धक आणि स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. स्पर्धेदरम्यान मौल्यवान वस्तू परिधान करून येऊ नये. कोणतीही वस्तू हरवल्यास त्याला आयोजक जबाबदार राहणार नाहीत. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र अशी पारितोषिके तर सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाणार आहे.

स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी राधा केरकर - ९०२११६३५८०, नेहा कोळंबकर - ९४०४९२०३६६, समृद्धी धुरी - ९४२०४३७६५७, अनुष्का चव्हाण - ९४०४५४६३३७, पल्लवी खानोलकर - ९०११०५६६३१७, सुविधा तिनईकर - ९४२३६८२११४, कविता वेंगुर्लेकर - ९९७५९९४९५२, वैशाली शंकरदास - ९४२२३९२९४८, कोमल चव्हाण - ८६००३७३१७८, सिद्धी बांदेकर - ९४०५६२८८४८ यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत मालवणवासीय महिला ग्रुप, महाविद्यालयीन ग्रुप, सामाजिक संस्था, महिला बचत गट, सर्व महिला खेळाडू, सर्व माजी शालेय महिला ग्रुप यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom