भाजपा मच्छीमार सेलचे कुटुंबीयांना आश्वासन
मच्छिमार सेल, जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची माहिती
देवगड : देवगड तारा मुंबरी येथे मासेमारी करताना संतोष सारंग या मच्छीमाराचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीय यांची भाजप मच्छीमार सेल आणि देवगड भाजपा पदाधिकारी यांनी तातडीने भेट घेतली.वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर पोलिस,आरोग्य आणि मत्स्यविभाग यांच्याशी संपर्क साधला व संबंधित विषयात तात्काळ कागदपत्रे पूर्तता करण्याच्या सूचना केल्या. यावेळी मत्स्य विभाग कार्यालय यांच्या वतीने सागर सुरक्षा रक्षक श्री.खडपे उपस्थित होते.यावेळी मत्स्यविभाग अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीय यांना रुपये सहा लाख पर्यंत रक्कम मिळवून देण्या संदर्भात माहिती घेतली गेली.
मा. मत्स्योद्योग मंत्री श्री .नितेश राणे यांच्या माध्यमातून सदरची प्रक्रिया वेगवान करून लवकरात लवकर सदरची शासकीय मदत मिळवून देण्याबाबत सारंग कुटुंबीय यांना आश्वासीत करण्यात आले.यावेळी भाजपा चे रविकिरण तोरसकर, बाळ खडपे, न्यानेश्वर खवळे,बापू जुवाटकर,सुहास पराडकर,छोटू पटेल, मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधी श्री.लक्ष्मण तारी, गाबीत समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

