मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी निमित्त होते वनराई बंधारा. प्रशालेचे विद्यार्थी समाजामध्ये जाऊन अनेक समाज उपयोगी कामे सातत्याने करत असतात.यामध्ये घरोघरी जाऊन माती परीक्षण, ब्लड प्रेशर तपासणी, पाणी परीक्षण, घरगुती अर्थिंग तपासणी, इत्यादी कामे ते करत आहेत.
इयत्ता आठवी व नववीच्या 28 विद्यार्थ्यांनी हाती घेतले वनराई बांधण्याचे काम. मसदे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अजित भास्कर प्रभू यांनी प्रशाले कडून वनराई बंधारा बांधण्यासाठी सहकार्य मागितले प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी लगेच होकार देऊन कामाला सुरुवात झाली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मसदे गावात जाऊन गावातील लोकांच्या मदतीने श्रमदानातून होळीचा बंधारा बांधून पूर्ण केला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी श्रमाचे महत्त्व,श्रमप्रतिष्ठा यासारखी मूल्ये जोपासली. बंधारा बांधण्याचे फायदे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी सांगितले मसदे येथील होळीचा बंधारा बांधल्यामुळे जवळपास एक एकरी क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे गावातील सर्व लोकांना याचा फायदा होणार आहे. या बंधाऱ्यामुळे नाचणी, कुळीथ, भुईमूग यासारखी बागायती शेती तसेच माडांच्या झाडांसारख्या फळझाडांना पाणी उपलब्ध होणार आहे. असे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही तो चारा या पाण्याद्वारे घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या समवेत नऊ शेतकरी उपस्थित होते गावातील लोकांच्या समवेत श्रमदानातून हा बंधारा बांधून पूर्ण केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वनराई बांधल्यामुळे श्री ताराचंद आत्माराम पालव, श्री अनिल भास्कर प्रभू, श्री यतीन मेस्त्री व श्री कीर्तीराज कदम यांनी सर्वांना धन्यवाद दिले. सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भास्कर प्रभू यांचे वनराई बंधाऱ्यासाठी विशेष योगदान लाभले. गावातील लोकांनी शहराकडे न वळता जर आधुनिक पद्धतीने शेती केली तर गावचा विकास नक्की होऊ शकतो हा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला. हा बंधारा बांधण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर, लिपिक श्री महेश सत्यवान गावडे,व कुमारी हर्षदा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले

