Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

राज्यस्तरीय शाडूमाती श्री गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धेत देवाबागचे युवा मूर्तिकार निखिल कोळंबकर यांना प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय शाडूमाती श्री गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धेत देवाबागचे युवा मूर्तिकार निखिल कोळंबकर यांना प्रथम क्रमांक

श्री. गणेश मूर्तिकार संघटना संगमेश्वर आयोजित आ. शेखर निकम पुरस्कृत आमदार चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित खोत | मालवण : श्री. गणेश मूर्तिकार संघटना संगमेश्वर आयोजित आमदार शेखर निकम पुरस्कृत आमदार चषक राज्यस्तरीय शाडूमाती श्री गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धेत मालवण देवाबाग गावचे युवा मूर्तिकार निखिल कोळंबकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख येथील लक्ष्मी नृसिंह कार्यालय येथे नुकतीच दोन दिवसीय राज्यस्तरीय शाडूमाती श्री गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धा संपन्न झाली. राज्य भरातून अनेक मूर्तिकार यां स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. सर्वांनीच स्पर्धा आयोजनाचे विशेष कौतुक केले.

प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक देवबाग मालवण येथील एक अत्यंत गुणी कलारत्न निखिल कोळंबकर यांच्या मूर्ती कलेला प्राप्त झाले आहे. त्यानी मूर्तीत दाखविलेले बारकावे, सुबकता हे सर्व महत्वाचे ठरले.गतवर्षी कुडाळ येथे आयोजित जिल्हा स्तरावर स्पर्धेत निखिल यांनी प्राथम क्रमांक प्राप्त केला होता.

कल्चर आर्ट, मास्टर ऑफ फाईन आर्ट आदी पदव्या प्राप्त केल्या नंतर निखिल यांनी मूर्ती कलेवर अधिक लक्ष केंद्रित केले. हेरंब कला दालन देवबाग येथे मूर्तिकार सुनील केळूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिकला व मूर्तिकलेतील बारकावे आत्मसात करत असताना निखिल हे युवा मूर्तिकार म्हणून नावारूपास आले. मूर्तीकलेच्या माध्यमातून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली.

गुरुवर्य सुनील केळूसकर यांचे मार्गदर्शन आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे निखिल यांनी सांगितले आहे. तर यापुढेही पर्यावरण पूरक शाडू माती पासून मूर्तीकला करतं असताना ही पारंपरिक कला जोपासणे, जतन करणे तसेच याचा प्रचार, प्रसार करणे यासाठी प्रयत्नाशील असल्याचे निखिल कोळंबकर यांनी सांगितले. संगमेश्वर येथील राज्यस्तरीय स्पर्धा आयोजकांचे निखिल यांनी आभार व्यक्त केले आहेत.

राज्यस्तरीय श्री गणेशमुर्ती स्पर्धेचा निकाल

▪️प्रथम क्रमांक श्री. निखिल कोळंबकर मालवण रोख रूपये २५००१/- व चषक
▪️द्वितीय क्रमांक श्री. सुयोग पांचाळ, रत्नागिरी रोख रू.१५००१/- व चषक
▪️तृतीय क्रमांक श्री. वैभव सापते बेलारी रोख रू.१०००१/- व चषक
▪️उत्तेजनार्थ प्रथमेश गोंधळी हातीव,
▪️उत्तेजनार्थ अजय पारकर रत्नागिरी
▪️उत्तेजनार्थ घनश्याम कांबळे रत्नागिरी

▪️उत्तेजनार्थ राहूल कळंबटे रत्नागिरी

▪️उत्तेजनार्थ रोहित कळबटे रत्नागिरी

▪️प्रत्येकी रोख रू. २००१/- व चषक देऊन गौरवण्यात आले.

▪️या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. विष्णू परीट सर निसर्ग चित्रकार, श्री. रणजित मराठे (प्राचार्य डी कॅड काॅलेज) श्री. युयूत्सू आर्ते यांची तर बोरसूतकर गुरूजी, नरेंद्र
भोंदे, प्रकाश तांबट राजापूर, योगेश मेस्त्री व महेश खानविलकर रत्नागिरी, विजय पांचाळ व मेस्त्री यांची उपस्थिती लाभली होती.

💥 VIDEO | राजकोट | छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणीला सुरवात

https://youtu.be/yHNLaB12ozA

rapan bottom