Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

फ्लाय९१च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध

फ्लाय९१च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध

निलेश जोशी | कुडाळ : गोवा स्थित विमान कंपनी फ्लाय९१च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध झाल्या आहेत. फ्लाय९१ने पेटीएमसोबत भागीदारी करून ऑनलाईन तिकीट सेवांचा विस्तार केला आहे अशी माहिती फ्लाय९१च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या भागीदारीमुळे फ्लाय९१च्या लाखो प्रवाशांना आता पेटीएमच्या माध्यमातून प्रवासासाठी तिकीट बुक करता येणार आहे.
गोवा स्थित फ्लाय९१ आणि पेटीएम ब्रँडची मालकी असलेली नोएडा स्थित वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) यांच्यातील भागीदारी गेल्या आठवड्यात झाली.“पेटीएम तसेच इतर ऑनलाईन पेमेंट अँप्सवर फ्लाय९१ च्या तिकिट्स आता उपलब्ध आहेत याबद्दल आम्ही उत्साही आहोत. ही भागीदारी B2C चॅनलमध्ये आमची उपस्थिती आणि पोहोच लक्षणीयरीत्या वाढवणारी आहे. ज्यामुळे आपल्याला संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या समूहाशी जुळण्यात मदत होईल. पेटीएमने स्वतःला एक पसंतीचे पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून यशस्वीरित्या स्थापित केले आहे. हा प्लॅटफॉर्म प्रादेशिक शहरांमध्ये जास्त वापरला जातो. फ्लाय९१ आणि पेटीएम हे दोनही भारतातील टायर २ टियर ३ शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारते. पेटीएमवर आमच्या सेवा उपलब्ध करून, आम्ही प्लॅटफॉर्मवर विसंबून राहणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी फ्लाय९१ आघाडीवर आणत आहोत, त्यांच्या शहरांमध्ये आमच्या उड्डाण सेवांबद्दल जागरूकता वाढवत आहोत,” असे फ्लाय९१ एमडी मनोज चाको यांनी सांगितले.
फ्लाय९१ हे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा येथून कार्यरत आहे आणि तोच त्याचा होम बेस आहे. सेवेच्या धोरणाचा भाग म्हणून ही विमान सेवा पुढील पाच वर्षात ५० हुन अधिक शहरांना ३० विमानांच्या ताफ्याने जोडण्याची योजना आखत आहे, ज्यात भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांवर लक्ष केंद्रित करेल. वर्तमानात फ्लाय९१ अगत्ती (लक्षद्वीप), बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग येथे उड्डाणे चालवते, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom