Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

बँक योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा

बँक योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा

जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना विविध बँकीग सुविधांचा वापर करत असतांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखी सारखी सुविधा उपलब्ध केलेली असून माजी केद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून प्रधानमंत्री पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकिय योजना जिल्हा बँक राबवित असून या योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा यासाठी जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत राहिल असे अभिवचन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मळेवाड शाखेच्या एटीएम् सेंटरचा शुभारंभ दि. ०३/०३ /२०२५ रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.एटीएम् सेंटर चे उद्धाटन अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापुन करण्यात आले.

प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. याप्रसंगी जागेचे मालक सगुण नाईक, व बँकेच्या मळेवाड शाखेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले लक्ष्मीकांत गावडे यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. आजगाव विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ नारोजी, मळेवाड ग्रा.पं.उपसरपंच हेमंत मराठे, गुरुनाथ मुळीक, सेवानिवृत्त शिक्षक वसंत राणे यांन बँकेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच उपसरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामस्थांच्या हस्ते अध्यक्ष मनिष दळवी व संचालक विद्याधर परब, रविंद्र मडगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री विद्याधर परब, रविंद्र मडगावकर तसेच मळेवाड गावाच्या सरपंच सौ. मीनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, मळेवाड विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पार्सेकर, वेतोबा विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सखाराम ठाकूर, श्री. रमाकांत नाईक, गणपत टोपले, गजानन शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom