Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महास्वच्छता अभियान

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महास्वच्छता अभियान

मालवण | प्रतिनिधी : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने देशव्यापी स्वच्छता अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याचीच दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी डॉ.श्री.दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले.


आपल्यावर या मातृभूमिचे या देशाचे तसेच या समाजाचे ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवा भाव अंतरी रुजू केला पाहिजे आणि याच श्रीसेवेतून या ऋणातून मुक्तता होईल. यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर करत आहेत.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त, आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या देशव्यापी स्वच्छता अभियान कार्यक्रम २ मार्च रोजी संपूर्ण भारत भर राबविण्यात आला. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बिच समुद्रकिनारा, मालवण, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी. फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत या १० ठिकाणावर एकूण २३७६ श्री सदस्य उपस्थित होते. व अंदाजित ८१ टन कचरा संग्रहित करून 39500 चौ.मी. परिसर, 10 कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. या कार्यामागे साहजिकच डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन त्यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे असे सांगण्यात आले.

rapan bottom