Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कवठी खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

कवठी खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

उद्या कुडाळ न्यायालयात हजर करणार

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील कवठी अन्नशांतीवाडी येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर वय 52) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले मुख्य आरोपी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय 40)  व शैलेश दत्ताराम कलरकर करालकर (वय 43) (दोघेही राहणार कवठी वाडीवाडा) या दोघांना चेंदवण-निरुखेवाडी येथून निवती पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. या दोघांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी करलकर यांचा कामगार व या खून प्रकरणात सहभागी असलेल्या श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता खून प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.
      काजूच्या बागेत जाऊन काजू चोरून उलट वडिलांना व कामगारांना धमकावल्याच्या रागाने त्याचा जाब विचारण्यासाठी दादा करलकर, शैलेश करलकर व श्यामसुंदर वाडयेकर हे संदीप करलकर यांच्या घरी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केले होते.  त्यावेळी त्यांच्यात झालेल्या मारामारीत संदीप करलकर याला दादा करलकर शैलेश करलकर व श्यामसुंदर वाडयेकर यांनी मिळून जबर मारहाण केली होती. या मारामारीत संदीप जखमी झाला. त्याच्या मानेचा मणका तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
    मात्र घटनेनंतर कोणीच पोलीस यंत्रणेला कळवले नाही. 28  फेब्रुवारी रोजी याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. आता संदीपच्या खुनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. उद्या त्यांना  न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर तिन्ही आरोपीकडे तपास करताना यात आणखी कोणी सहभागी होते का याचा तपास पोलीस करणार आहेत.

rapan bottom