Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वधूवरांची मने जुळविण्याचे मौलिक कार्य भंडारी समाजाने केले : ॲड. प्रदीप मिठबावकर

वधूवरांची मने जुळविण्याचे मौलिक कार्य भंडारी समाजाने केले : ॲड. प्रदीप मिठबावकर

कट्टा येथे भंडारी समाज आयोजित सर्वजातीय वधुवर मेळावा संपन्न

मालवण : वधु वरांना एकाच छताखाली आणण्याचे व त्याची मने जुळविण्याचे मौलिक कार्य कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांनी केले आहे. सामाजिक स्तरावर भंडारी समाजाचे कार्य नेहमीच आदर्शवत असेच राहिले आहे. असे प्रतिपादन ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.  

दीपप्रज्वलन करून व
गणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सदर केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन प्रदीप मिठबावकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष आणि कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ अध्यक्ष मामा माडये, प्रदीप आवळेगावकर, आनंद वराडकर, गणेश वाईरकर, बाबुराव मसुरकर, पंढरीनाथ मसुरकर, मामा बांदिवडेकर, बबन मिठबावकर, गीतांजली हिंदळेकर, भाऊ नार्वेकर, प्रवीण मिठबावकर, शरद केळुसकर, किशोर वाक्कर, संदेश नाईक, यावेळी आनंद टेमकर, सुरेश कांबळी, निलेश हडकर, मंगेश माडये, अजय मयेकर, गौरव नाईक, सुनील पोखरणकर, जीजी वाईरकर, प्रकाश सरमळकर, सुरेंद्र जबडे, योगेश पाटकर, संतोष नागवेकर, विद्याधर चिंदरकर, अनिल पाटील, सुनील शिरोडकर, संदीप सरमळकर, निरज माडये, सिद्धेश वराडकर, विशाल वाईरकर, प्राप्ती मिठबावकर, त्रिशा हडकर, वर्षा मिठबावकर, मधुरा माडये, गीता नाईक, मेघा पोखरणकर, कीर्ती मयेकर, प्रांजल नांदोसकर, प्रियांका जबडे, दर्शना नाईक, उपस्थित होते.

यावेळी मामा माडये व परिवार यांचे समाजासाठी नेहमी असणारे योगदान व ओम गणेश साई मंगल कार्यालयच्या रौप्य महोत्सवी वर्ष याबद्दल त्याचा व कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मसुरे येथील पंढरीनाथ मसुरकर म्हणाले, या कार्यक्रमामुळे वधूवरांच्या व त्यांच्या नातेवाईक यांच्या समस्या सोडविन्यास मदत होणार आहे.  असे ते म्हणाले.

या वधुवर परिचय मेळाव्यात ८६ वधू व २७० वरानी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव नाईक, प्रास्ताविक अनिल पाटील तर आभार कीर्ती मयेकर यांनी मानले.

फोटो : कट्टा येथे भंडारी समाज आयोजित सर्वजातीय वधुवर मेळाव्याचे उदघाटन करताना ॲड. प्रदीप मिठबावकर. (अमित खोत, मालवण)

फोटो : मामा माडये व परिवार यांचे समाजासाठी नेहमी असणारे योगदान व ओम गणेश साई मंगल कार्यालयच्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom