Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये  एनएसएस युनिटतर्फे अवयवदान जनजागृती शिबिर संपन्न

श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये  एनएसएस युनिटतर्फे अवयवदान जनजागृती शिबिर संपन्न

निलेश जोशी | कुडाळ : हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी),  सिंधुदुर्ग यांच्या सहयोगातुन घेण्यात आलेले अवयवदान जनजागृती शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.    
  विद्यार्थ्यांना आणि कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  अवयवदानाचे महत्त्व, त्याच्या वैद्यकीय प्रक्रिया आणि त्याचा
जीवन वाचविण्यावरील प्रभाव याबाबत माहिती देणे हा शिबिराचा उद्देश होता. या शिबीराला जीएमसी सिंधुदुर्गच्या मान्यवर प्राध्यापकांचे आणि नोडल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. 
     कॅम्पस डायरेक्टर श्रीमती रुतुजा परब, विभागप्रमुख श्री. संदेश सुळ, शैक्षणिक प्रभारी अमित शाहपूरकर, कार्यक्रम समन्वयक सौरभ ठाकूर आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते. 
    जीएमसी सिंधुदुर्गच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. संतोष मंगळकर (सूक्ष्मजीवशास्त्र), डॉ. विजय वाघमारे (ऑर्थोपेडिक्स), डॉ. समृद्धी कांबळे (दंतशास्त्र) आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. या सत्रामध्ये अवयवदानासंबंधी असलेले गैरसमज दूर करण्यावर आणि विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. 
     याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी मोफत बीएमआय तपासणी देखील आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये तज्ज्ञांनी त्यांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्राने झाली. प्राध्यापक श्री. महादेव परब यांच्या आभार प्रदर्शनानंतर शिबीराचा समारोप झाला.
   दरम्यान हे जनजागृती शिबिर विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी माहिती देण्यात आणि सुज्ञ चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरले. एनएसएस युनिट आणि महाविद्यालय प्रशासनाने जीएमसी सिंधुदुर्गच्या तज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यात अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

rapan bottom