Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

अपप्रवृत्तीना समाजात थारा नकोच !

अपप्रवृत्तीना समाजात थारा नकोच !

मालवणातील शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी मागणी....

मालवण | प्रतिनिधी : आगामी काळात होळी, धुलीवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद सारखे सण साजरे होणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवणे आपलं सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी दक्ष राहत अपप्रवृत्तींना थारा देऊ नये असे आवाहन पोलिस उप अधीक्षक घनःश्याम आढाव यांनी केले. दरम्यान शांतता बिघडविणाऱ्या त्या भंगारवाल्यांच्या प्रकरणामुळे अनेक अनधिकृत बाबी समोर आल्या आहेत. पोलिस आणि प्रशासनाने सुद्धा अशा प्रवृत्तींच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारावा अशा सूचना नागरिकांकडून करण्यात आल्या.

शनिवारी मालवण पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक कोल्हे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी ॲड. समीर गवाणकर, हसरत खान, जॉन नऱ्होना, भाऊ सामंत, आवि सामंत, संदीप बोडवे, जाबीर खान, ललित चव्हाण, बाबी जोगी, श्रीराज बांदेकर, मुस्ताक अथणीकर, नदीम मुजावर, गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, समीर गोवेकर, सलाम मुजावर, सलीम खान, तेजस चव्हाण, रफीक शेख आदी उपस्थित झाले होते.

शांतता बिघडविणाऱ्या अनेक कृत्यात सहभाग असलेल्या त्या भंगारवाल्यांच्या भावासह त्याच्या कुटुंबियांना इथे कोणत्याही स्वरूपात थारा देऊ नये अशी सर्वानुमते मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. 


यावेळी बोलताना ॲड गवाणकर म्हणाले, गोळवण मध्ये जो प्रकार घडला आहे त्यामुळे अनधिकृत वास्तव्याच्या घटना चर्चेला आल्या आहेत. परप्रांतीय नागरिकांना सहज पणे आणि चुकीच्या पद्धतीने घरपत्रक उतारे, रेशनकार्ड मिळत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. मालवण मधील भंगारवाल्यावरील कारवाईं प्रकरणात त्याने संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या असतील तर त्याही समोर येऊ शकतात. यासाठी त्याच्या जवळील सामानाची पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक होते. मिडिया ट्रायलला कोणताही वाव मिळू नये यासाठी प्रशासनानेही काळजी घ्यावी अशी सूचना ॲड गवाणकर यांनी केली. गोवंश पलायन करण्यामागे काही गाड्या सामील आहेत. पोलिसांनी यात सतर्कता बाळगणे असेही गवाणकर म्हणाले.

शहरात आणि गावागावात फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे करून संशयाने पाहिले जाते. त्यात काही प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. अशा भांगरवाल्यांना खात्री करून प्रशासनाने स्वतंत्र ओळखपत्र वितरीत करावे अशी सूचना हसरत खान यांनी केली. तर बनावट आधार कार्ड जवळ बाळगून अनेकजण फिरत असतात. लोकांमध्ये अशा मुळे संशयाचे वातावरण निर्माण होते. यासाठी पोलिस यंत्रणेकडे स्थानिक पातळीवर आधार कार्ड व्हेरिफिकेशन यंत्रणा उपलब्ध असावी अशी मागणी अविनाश सामंत यांनी केली.

फेरीवाले किंवा किनारपट्टीवर हातगाडीवाले नाव बदलून व्यवसाय करत आहेत याकडे भाऊ सामंत यांनी लक्ष वेधले. हा सुद्धा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सामंत म्हणाले. अशा प्रकारांना आळा बसावा अशी त्यांनी मागणी केली.

मालवण मध्ये सर्व जाती पंथाचे नागरिक सलोख्याने वागत आले आहेत. एकमेकांच्या सणाउत्सवात सामील होत आले आहेत. असे सांगण्यात आले.

म्हाडा कॉलनीत काही अनैतिक प्रकार चालत असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या यावर त्या ठिकाणी आजच पोलिस पथक पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक कोल्हे म्हणाले. अन्य ठिकाणीही तुम्हाला काही संशयास्पद, अनधिकृत  वावर आढळून आल्यास पोलिसांना त्वरित कळवा. येणाऱ्या सणांच्या काळात शांतता राखा असे आवाहन त्यांनी केलं.

तर तडीपारीची कारवाई करू: आढाव...

आम्ही कुणालाही इथे येऊन व्यवसाय करू नका असे म्हणणार नाही. परंतु कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तिबाबत आम्हाला कळवा. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये. दोन किंवा त्या पेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील तर पोलिस अशा व्यक्तीच्या विरोधात तडीपारीची कारवाई करू शकतात असे पोलिस उप विभागीय अधिकारी आढावा म्हणाले.


फोटो : मालवण पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. (अमित खोत, मालवण)

rapan bottom