Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणात परप्रांतीयांच्या त्रासाबाबत जेष्ठ नागरिकांची तक्रार

मालवणात परप्रांतीयांच्या त्रासाबाबत जेष्ठ नागरिकांची तक्रार

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिका हद्दीतील सातेरी मांड येथे काही परप्रांतीय गेली दोन वर्षे राहत आहेत. रात्री दारूच्या नशेत असणारे हे परप्रांतीय रस्त्यावर आक्षेपार्ह कृत्य करतात. यां मार्गांवरून नागरिकांना एकटे फिरणे मुश्किल झाले आहे. महिलांना तर अधिक भीती आहे. तरी त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी राजन भोजणे यांनी तहसीलदार तसेच मालवण पोलिसांकडे केली आहे.

राजन भोजणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नगरपालिका हद्दीतील सागरीमहामार्ग या ठिकाणाहून निघालेला बायपास आंगणेवाडीरोड येथे मा. म्यु.घर नं. २८२५ड या घरामध्ये माझे कुटुंबियांसह राहतो. तसेच त्याच ठिकाणी माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. सदरहू व्यवसाय करुन मी माझा व माझे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितो. गेली २ ते ३ वर्षापासून आमचे राहते घरापासून पुढे सुमारे ५० ते ६० मीटरवर परप्रांतिय परप्रांतीय लोक भाडेतत्वावर राहतात. तसेच ते रात्री अपरात्री लगत असलेल्या नदीमध्ये जावून मच्छिमारी करतात. रस्त्यावर आरडाओरड व संपूर्ण परिसरामध्ये कचरा, घाण टाकतात. इतकेच नव्हे तर आम्ही आमचा हॉटेल व्यवसाय बंद करुन रात्रीच्या वेळी झोपी जाण्याचे दरम्याने हे लोक दारुच्या नशेमध्ये या परिसरामध्ये विनाकरण आराडाओरड करणे अशी कृत्य करतात. त्यांचे पासून स्त्रियांना व आम्हांस सदर परिसरामध्ये एकटे फिरणे कठीण झालेले आहे. या परप्रांतिय लोकांची तात्काळ व तातडीने चौकशी करून कारवाई कारवाई आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी भोजणे यांनी केली आहे.

rapan bottom