Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आंगणेवाडी श्री भराडी देवीचे दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आंगणेवाडी श्री भराडी देवीचे दर्शन

आ. निलेश राणे यांनी मागणी केलेला येथील पाणी व टॉवर प्रश्न सोडवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मालवण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवार 26 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग मालवण दौऱ्यात आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे व मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सेक्रेटरी काका आंगणे, बाबू आंगणे यांसह आंगणे कुटुंबीय तसेच आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, संजू परब, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, आंनद शिरवलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, बाळू नाटेकर, बंटी तुळसकर, अरविंद करलकर, दादा साईल, रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक राणे, आबा धडाम, हर्षद पारकर, दीपलक्ष्मी पडते, सरोज परब, नगरसेविका चांदणी कांबळी, नैना मांजरेकर, श्रुती वर्धम, उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, सोनाली पाटकर, अंजना सामंत, सिद्धी शिरसाठ, तुळसकर, नाटेकर, सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर, मकरंद राणे, छोटू ठाकुर, प्रितम गावडे, दिलीप बिरमोळे, पंढरीनाथ माने, राजू बिडये, ऋषिकेश सामंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंगणेवाडी येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खाली होत असलेल्या धरणातून पाणी लिफ्ट करून आंगणेवाडी येथे आणावे लागेल. त्यासाठी मोठया निधीची आवश्यकता असून हा निधी राज्य बजेट माध्यमातून मिळावा. तसेच याठिकाणी जिओ मोबाईल टॉवर मंजूर व्हावा. यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. आपण यात लक्ष घालावे व निधी मंजूर व्हावा.   याबाबत आमदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार निलेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्धता केली जाईल असे सांगितले. तसेच आमदार निलेश राणे यांच्या कामाचे विशेष कौतुक करताना आंगणेवाडी तसेच मालवण कुडाळच्या विकासासाठी निलेश राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

rapan bottom