Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ मधून होणारी अवैध दारू गुटखा वाहतूक रोखा

कुडाळ मधून होणारी अवैध दारू गुटखा वाहतूक रोखा

मनसेचे एक्साइज विभागाला निवेदन

वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन

निलेश जोशी | कुडाळ : गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखावी असे निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरूपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटांनाद तथा बोंब मारो आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक मिलिंद गुरव यांना निवेदन देत कुडाळ तालुक्यातून अवैधरित्या होणारी दारू, गुटखा व अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पालकमंत्री यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई का होत नाही असे विचारल्यावर उत्पादन शुल्क निरीक्षक निरीक्षक यांनी मनुष्यबळ कमी असल्याची हतबलता बोलून दाखवली. यावर मनसेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागास रस्त्यावर उतरून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन देत कुडाळ पोलीस निरीक्षक यांची मदत घेण्याचे सुचविले. तसेच येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरूपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटांनाद तथा बोंब मारो आंदोलन करेल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर,माजी उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष नेरुर अनिकेत ठाकुर,अक्षय जोशी,सुरज नेरूरकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

rapan bottom