ज़िल्हा वार्षिक योजनेमधून निधी मंजूर
मालवण | प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने ज़िल्हा वार्षिक योजनेमधून गोठणे बांदकीवाडी सडेवाडी जोड रस्ता मंजूर करण्यात आला.
याचे भूमिपूजन मालवण तालुका माजी उपसभापती राजू परुळेकर, गोठणे सरपंच सौ. दीप्ती दयाळ हाटले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रावण पं. स. प्रभारी दयाळ हाटले, बूथ कमिटी अध्यक्ष संतोष धुरी, माजी सरपंच विजय घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र सांडव, घनश्याम चव्हाण, राजेंद्र लाड, जयसिंग परब, जयप्रकाश परब सुरेश साटम, दिगंबर घाडी, राजू जगताप, मधुकर हाटले, गजानन हाटले, सुहास हाटले, संदीप सांडव, महेश साटम, ओंकार हाटले, शंकर हाटले, संतोष लाड, शैलेश लाड, संदेश कुवरे, प्रकाश कुवरे, सुभाष हाटले, दशरथ साटम, सुरेश घाडी, विजय परब, उदय धुरी उपस्थित होते.
फोटो : गोठणे बांदकीवाडी सडेवाडी जोड रस्ता भूमिपूजन माजी सभापती राजू परुळेकर, गोठणे सरपंच सौ. दीप्ती दयाळ हाटले यांच्या हस्ते करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

गोठणे बांदकीवाडी सडेवाडी येथे जोड रस्ता भूमिपूजन
