Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कामगार नेते अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना दिलासा

कामगार नेते अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना दिलासा

आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार


मालवण | प्रतिनिधी : महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आवश्यक काही कागदपत्रांची पूर्तता न केल्यास कामावरून कमी करण्याचे पत्र ठेकेदाराने कर्मचाऱ्याना दिले. या प्रश्नी कामगार नेते अशोक सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची भेट घेत एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढू देणार नाही असा इशारा दिला.

दरम्यान, अधीक्षक अभियंता यांनी एकाही कर्मचाऱ्याला काढणार नाही असा शब्द देत कागपत्रांची पूर्तता करण्यास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असा शब्द दिल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महावितरणचे शेकडो कंत्राटी कर्मचारी गेलो अनेक वर्षे काम करत आहेत. मात्र अचानक या कर्मचाऱ्यांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 ही शेवटची डेडलाईन देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची भेट घेत याची माहिती दिली. कामावरून काढू नये असे महावितरणला सांगण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर कामगार नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ४०० ते ४५० कामगार हे महावितरण कंपनीमध्ये रिक्त पदाच्या अनुषंगाने वर्षानुवर्षे प्रामाणिक पणे कंत्राटी पद्धतीवर तांत्रिक कायम कामगारांचे काम करीत आहेत. वारा कींवा पाऊस असुदेत आपल्या जीवाची तमा न बाळगता हे कंत्राटी तांत्रिक कामगार जनतेची सेवाच आपल्या तुटपुंज्या पगारातून करीत आहेत. तसेच वीज उद्‌द्योग हा अतिशय धोकादायक उ‌द्योग म्हणून गणला जातो. कंत्राटी तांत्रिक कामगारांना कमी करण्याचे परीपत्रक आपल्या कार्यालयातून ठेकेदार याच्याकडे गेलेले असुन कुडाळ व कणकवली विभागातील तांत्रिक कंत्राटी कामगार हे घाबरले आहेत. त्यामुळे यातील एकही कर्मचाऱ्याला कमी करू देणार नाही असा इशारा अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांना दिला. काही अपूर्ण कागदपत्रे आहेत ती आम्ही पूर्ण करून देऊ पण कर्मचाऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले.

अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी एकाही कर्मचाऱ्याला काढून टाकले जाणार नाही. कर्मचाऱ्यांची जी काही अपुरी कागदपत्रे आहेत त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ती पूर्ण करून घेण्यात येतील. त्यासाठी आवश्यक फॉर्म भरण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येणाऱ्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शब्द अधीक्षक अभियंता साळुंखे यांनी कामगार नेते अशोक सावंत आणि कर्मचाऱ्यांना दिला. त्यामुळे गेले अनेक दिवस आपली नोकरी जाईल या भीतीने घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

फोटो : वीज कंत्राटी कामगार यांच्या सोबत कामगार नेते अशोक सावंत. (अमित खोत, मालवण)

rapan bottom