Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देशविरोधी भुमिका घेणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकाची अनधिकृत गाडी जप्त

देशविरोधी भुमिका घेणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकाची अनधिकृत गाडी जप्त

आ. निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची कारवाई सुरूच

भारत विरोधी परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकांचे रॅकेट उध्वस्त करणार : आमदार निलेश राणे

मालवण | प्रतिनिधी : भारत विरोधी घोषणाबाजी करणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकांचे रॅकेट उध्वस्त करणार असा निर्धार कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिके नंतर आडवण येथील देशविरोधी भंगार व्यवसायिका विरोधात कठोर कारवाई प्रशासनाकडून सुरु आहे. यां भंगार व्यवसायिकाच्या गाड्या अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आ. निलेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे आरटीओ नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथक भंगार विक्रेत्यांच्या डेपोमध्ये गेले असता टाटा एस कंपनीचे वाहन अनधिकृतपणे असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान हे वाहन ताब्यात घेण्यात आली आहे. सदरची गाडी मालवण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून यानंतरच्या काळात देखील भंगार विक्रेत्यांकडे जिल्ह्यात अनधिकृतपणे वापरात असलेल्या गाड्यांची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हा परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी म्हटले आहे.

तर अश्या देश विरोधी प्रवृत्तीचे रॅकेट उध्वस्त करणार असल्याचा इशारा आ. निलेश राणेंनी दिला आहे. तसेच अश्या परप्रांतीय प्रवृत्तीकडे आधार कार्ड अन्य कागदपत्रे येतात कुठून. याचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याचे आ. निलेश राणे म्हणाले.

मालवण शहरातील वायरी आडवण परिसरात मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्या होत्या. सर्वत्र संताप पसरला. आमदार निलेश राणे यांनी या घटनेनंतर आक्रमक होत प्रशासनामार्फत येथील भंगार विक्रेत्यांच्या वस्तीवर बुलडोझर फिरवला. या कारवाईचे हिंदुत्ववादी नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

वाहनावर कारवाई नंतर पोलीस ठाण्यात वाहन जमा करण्यात आले. आरटीओ मार्फत यानंतर देखील तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. या पथकात मोटर वाहन निरीक्षक संदीप भोसले, केतन पाटील, प्रीतम पवार आदी अधिकारी सहभागी झाले होते.

rapan bottom