Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मंत्रिपदाच्या शपथेचा पालकमंत्र्यांना विसर - कुणाल किनळेकर

मंत्रिपदाच्या शपथेचा पालकमंत्र्यांना विसर - कुणाल किनळेकर

नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याचा मनसेतर्फे निषेध

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा बंदर विकास तसेच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय, असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, काही दिवसांपूर्वी ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तसेच सावंतवाडी तालुक्यातील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिथे भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही, त्या ठिकाणी विकास निधी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून नि:पक्षपाती राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या घेतलेल्या शपथेचा विसर पडलेला दिसत आहे. मंत्री नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मान्य आहे का? एरवी पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रत्येक वेळी भूमिका मांडणारे दिपक केसरकर यावेळी गप्प का? अशाप्रकारे जर सत्ताधारी म्हणून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीना विकास निधीबाबत दुजाभाव कोणी दाखवत असेल तर त्याला यापूर्वी दाखविलेलेच आहे. आता पुन्हा एकदा भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनताच योग्य उत्तर देईल, असे कुणाल किनळेकर यांनी शेवटी म्हटले आहे.

rapan bottom