Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

भव्य दिव्य लेझर शोचे कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवात मंत्री नितेश राणे यांच्या वतीने आयोजन

भव्य दिव्य लेझर शोचे कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवात मंत्री नितेश राणे यांच्या वतीने आयोजन

देवगड : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे.

लेझर शो हे यात्रेचे मुख्य आकर्षण असून, भाविकांना या शोच्या माध्यमातून शिवाचे भव्य दर्शन घडवण्याचा मानस नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. हा अनोखा अनुभव मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या लेझर शोमुळे यात्रेत आलेले भाविक अधिक काळ थांबतील आणि हा अद्भुत अनुभव घेऊ शकतील, अशी अपेक्षा संदीप साटम यांनी व्यक्त केली आहे.

महाशिवरात्री यात्रा भव्य दिव्य आणि सुरक्षित व्हावी यासाठी संपूर्ण प्रशासन नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायत व कुणकेश्वर ट्रस्टही या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा विशेष लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.

भव्य दिव्य लेझर शो – विशेष आकर्षण

महाशिवरात्रीच्या निमित्ताने यंदा कुणकेश्वर, देवगड येथे सुप्रसिद्ध आर. के. लेझर आणि अमित पाटील यांच्या टीमकडून भव्य लेझर शोचे सादरीकरण होणार आहे. या टीमने याआधी अहमदाबाद वर्ल्ड कप फाइनल, अरिजित सिंग लाइव (पुणे), जामखेड किल्ला शो आणि प्रयागराज कुंभ मेळा यांसारख्या भव्य कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

भाविकांना २५ व २६ फेब्रुवारीच्या सायंकाळी हा नेत्रदीपक शो पाहण्याची संधी मिळणार आहे. यात ‘शिवतांडव’ व ‘बीम शो’ असे दोन विशेष सादरीकरणे करण्यात येणार आहेत.

सर्व शिवभक्तांनी या भव्य दिव्य लेझर शोचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे

rapan bottom