Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांचे पत्र ; अन परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी

आमदार निलेश राणे यांचे पत्र ; अन परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी

प्रशासनाने अनधिकृत बांधकामे केली जमीनदोस्त : नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचे केले स्वागत

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी पत्र दिल्यानंतर मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची
अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केले आहे.

मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा. असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास दिले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई झाली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, संदेश चव्हाण, अवी सामंत यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला आहे. दत्ता सामंत म्हणाले अश्या प्रकारे जर कोणी देशद्रोही भुमिका घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांसह महायुती नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भुमिका घेऊ. अशी अनधिकृत सर्व बांधकामे तात्काळ हटवा अशी भुमिका राहणार असल्याचे सामंत म्हणाले. तसेच देशविरोधी भुमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही सामंत म्हणाले

rapan bottom