Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी- राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरी

सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी- राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरी

वैभववाडी | प्रतिनिधी : विश्ववंदिता भारत देशाच्या निर्माण प्रक्रियेत संतांचे साहित्य हे वेदाचे सार असून ते जगाच्या कल्याणासाठी प्रेरक आहे असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष पू. स्वामी गोविंद देवगिरी यांनी केले. पुण्यातील मोशी येथील वेदश्री तपोवन इथे दासबोध सखोल अभ्यास फौंडेशन तर्फे आयोजित प. पू. स्वामींचा अमृत महोत्सवी सोहळा व अयोध्येतील वेदपाठ शाळेसाठी निधी अर्पण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी आणि उपक्रमाच्या संयोजक पूजनीय अक्का वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ओमकार जोशी यांनी सद्गुरु स्तवन या दासबोधातील समासाचे वाचन केले. पू.स्वामी गोविंद देवगिरी यांचा परिचय सौ.वृंदा जोगळेकर यांनी करून दिला. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे स्वामी गोविंद देवगिरी यांचा शाल, श्रीफळ, वस्त्र, मानपत्र आणि रुपये अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा निधी देऊन सत्कार करण्यात आला. ७६ दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे देण्यात आलेल्या या निधीचा विनियोग अयोध्येतील नियोजित समर्थ रामदास स्वामी वेदपाठ शाळेसाठी करणार असल्याचे स्वामी गोविंद देवगिरी यांनी सांगितले.


या कार्यक्रमात भागवतातील गीते ( लेखिका निर्मलाताई देवस्थळी), दासबोधातील माणिक मोती (शीलाताई देशमुख), समर्थांची पत्रे आणि समर्थांचे उपदेशपर काव्य (विजय लाड ) तसेच गीतेतील नवविधा भक्ती ( पुष्पा प्रभुणे)आणि ज्ञानबोध (विश्वनाथ प्रभुणे) या ग्रंथांचे प्रकाशन स्वामी गोविंद देवगिरी यांचे हस्ते करण्यात आले. फाउंडेशनचे संचालक विजय लाड यांनी प्रस्तावनेत संत रामदास

स्वामींचा दासबोध जनमानसात सर्व दूर पोहोचवण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन दासबोध सखोल अभ्यास मंडळाने अपार परिश्रम घेतल्याचे सांगितले. प.पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी समर्थांचे दासबोधातील विचार इतर ग्रंथा पेक्षा वेगळे व प्रभावी कसे हे अनेक संदर्भ देऊन सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अपर्णा वांगीकर, सौ. मेधा कुलकर्णी, सौ.रंजना पाटील, अनिल वाकणकर, आनंद जोगळेकर, बाळासाहेब पाटील, सौ.माधवी पानसे, सौ. विनया आणि विनायक विद्वांस , विवेक थिटे यांनी परिश्रम घेतले. संतोष सप्रे यांनी सूत्रसंचालन केल. सौ. प्रीति जोशी यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण व देश, विदेशातील साधकांसाठी थेट प्रक्षेपण केले तर सौ. अंजली खळदकर यांनी " पावन भिक्षा दे दो राम" ही प्रार्थना गायली. सौ. शुभदा थिटे यांनी आभार व्यक्त केले.

rapan bottom