आंगणेवाडी यात्रेत जाणाऱ्या भाविकांसाठी मनोज मोंडकर, पुनम चव्हाण यांचे सेवाकार्य
मालवण : मालवण शहरातील प्रभाग 9 येथून आंगणेवाडी यात्रेत जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस सेवा श्री. मनोज मोंडकर, सौं. पुनम चव्हाण यांच्या सहकार्यातून करण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रसाद चव्हाण, यशवंत गांवकर, मोहन मराळ, भाई लुडबे, रविना लुडबे, खवणेकर, जयू लुडबे आदी उपस्थित होते. गेली पाच वर्षे हा उपक्रम मोंडकर, चव्हाण यांच्या माध्यमातून राबवाला जात आहे. यावर्षीही अनेक भाविकांनी यां उपक्रमाचा लाभ घेतला.

