Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन

मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे यांनीही घेतले दर्शन

मालवण : भराडी मातेच्या दर्शनासाठी यावेळीही आलो आहे. भराडी देवीने राणे कुटुंबाला सर्वकाही दिले आहे. आता मागण्यासाठी काही ठेवले नाही. महाराष्ट्र लोककल्याणकारी राज्य व्हावं,
समृद्ध राज्य म्हणून देशात अग्रेसर व्हावं, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा असे साकडे आपण भराडी मातेला घातल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, दरवर्षी आम्ही राणे कुटुंब भराडी देवीच्या दर्शनाला येतो. देवीने आम्हा राणे कुटुंबाला भरपूर काही दिले आहे. देवीने राणे कुटुंबासह भाजपा महायुतीसाठी भरभरून दिले. नारायण राणे खासदार झाले. निलेश राणे आमदार झाले. मला राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे यावर्षी देवीचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. यात्रोत्सवात भाविकांना कुठलाही त्रास होता नये यासाठी बारकाईने लक्ष देत आहोत. प्रशासनाचे सर्व प्रमुख यात्रेत उपस्थित आहेत. भाविकांना दर्शन सुलभ मिळाले पाहिजे,
कोण कुठल्या पक्षाचा नाही. भाविक म्हणून सर्वांना दर्शन मिळावे. यावर्षी भाविकांना ज्या अडचणी आल्या त्या पुढच्या वर्षी येणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
आमदार निलेश राणे म्हणाले, आज आम्हा राणे कुटुंबाला जे काही मिळालं ते देवीच्या आशीर्वादाने मिळाले आहे. या यात्रेत राज्यातून नव्हे तर देशातून भाविक येतात. दरवर्षी यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढती आहे. त्यामुळे येथील प्रश्न सुद्धा वाढत आहेत. येथे पाण्याचा प्रश्न मोठा आहे. नळपाणी योजनेसाठी आवश्यक निधी मिळावा, यात्रेत मोबाईल नेटवर्क मिळत नाही.
मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या जागेच बक्षीस पत्र देण्यास येथील ग्रामस्थ तयार आहेत. येथे खासगी कंपनीचा टॉवर आणि येथील महत्वाचे सर्व प्रश्न महायुतीच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, आंगणे कुटुंबीय यांनी चांगली व्यवस्था केल्याने भाविकांना सुलभ दर्शन होत आहे. लाखो भाविक या यात्रेत येतात. आम्ही सुद्धा राजकीय जोडे बाजूला करून देवीच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो. भराडी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय मी नवीन कामाला सुरुवात करत नाही. गेल्यावर्षी देवीकडे राज्यात शिवशाहीचे सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊदे असे साकडे घातले होते. त्याप्रमाणे राज्यात शिवशाहीचे सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले. राज्यात हिंदुत्ववादी महायुतीचे सरकार आहे आहे. त्यामुळे राज्यातील जनतेशी सेवा करत राहणार. विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही श्री. शेलार यांनी सांगितले.
आमदार प्रवीण दरेकर यांनीही भराडी देवीचे दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे यांनीही देवीचे दर्शन घेतले.
भाजपच्या स्वागत कक्षात अनेक प्रकारचे दाखले वितरीत करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांनी या स्वागत कक्षाला भेट देत माहिती घेतली.

rapan bottom