Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ पोलीस ठाण्याचे रूप पालटणार

कुडाळ पोलीस ठाण्याचे रूप पालटणार

तीन अधिकारी आणि ४१ कर्मचारी निवास मंजूर

मुख्य इमारत होणार दुमजली

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे रूप आता लवकरच पालटणार आहे. सुसज्ज अशी दोन मजली इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी ४१ निवासस्थाने या कामाला मंजुरी मिळाली असून येत्या तीन महिन्यात हे काम सुरू होणार असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. यासाठीपोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.


कुडाळ पोलीस ठाण्याची इमारत हि ब्रिटिशकालीन आहे. १९१७ मध्ये हि इमारत बांधण्यात आली. कुडाळ पोलीस ठाण्याचा हा परिसर एकूण तीन एकर जागेत आहे. सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्याच्या तीन अधिकारी निवासस्थाने आणि ४१ कर्मचारी निवासस्थानाच्या कामाला मंत्रालय पातळीवर मंजुरी मिळाली असून येत्या तीन महिन्यात हे काम सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कुडा पोलीस ठाणे परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या ज्या ठिकाणी पोलीस ठाण्याची इमारत आहे त्याच्या समोर ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी पोलीस ठाण्याची मुख्य इमारत होणार आहे. ही इमारत दुमजली होणार आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तळमजला प्लस चार मजल्याची इमारत होणार आहे. या इमारतीत एकेचाळीस निवासस्थानी असतील तर अधिकाऱ्यांसह स्वतंत्र तीन निवासस्थानी असतील अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.


कुडाळ पोलीस स्टेशन आवर तीन एकर जागेत पसरला आहे. पोलीस स्टेशनची इमारत डागडुजीसाठी आली आहे तर निवासस्थाने सुद्धा मोडकळीस आल्यानं ती बंद अवस्थेत आहेत. आर आर पाटील गृहमंत्री असताना पोलीस स्टेशन व निवासस्थानाबाबत सर्वे झाला होता. मात्र निधीची तरतूद न झाल्याने काम जैसे थे होते. कुडाळ पोलीस स्टेशन सध्याच्या इमारतीत आहे ती इमारत १९१७ मध्ये ब्रिटिश राजवटीत बांधलेली आहे. या इमारतीची डागडुजी करून ती वापरली जात होती. मात्र आता पावसाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना इमारतीमध्ये बसताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते, याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेऊन गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. मंत्रालय पातळीवर या कामाला मंजुरी मिळाली असून इतर प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. गृह विभागाच्या अधिकारी अर्चना त्यागी यांनी यात विशेष लक्ष घातला आहे.


या परिसरात एक अधिकारी निवासस्थान असून ते ब्रिटिशकालीन आहे. खरेतर हे निवासस्थान जपण्याची आवश्यकता होती. निधी अभावी त्याची दुरुस्ती झाली नसल्याने ते पूर्णपणे मोडकळीस आले आहे. सध्या ३० कर्मचारी निवासस्थाने असून ती बंद अवस्थेत आहेत. दोन महिन्यापूर्वी या परिसराचा सर्वे झाला आणि उर्वरित प्रक्रियेने वेग घेतला आहे.


कुडाळ पोलीस स्थानकात सध्या अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्या मनाने निवासस्थाने अपुरी आहेत. सद्यस्थितीत सर्वच अधिकारी कर्मचारी भाड्याच्या निवास्थानात राहत आहेत. सध्या ज्या इमारतीत पोलीस स्टेशन आहे ती इमारत तशीच ठेवून या इमारतीचा वापर मुद्देमाल ठेवण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी २६ लाख निधी मंजूर झाला आहे. पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.

rapan bottom