Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जय जय भराडी देवी...!

जय जय भराडी देवी...!



लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सव विशेष...
-----------------------------------

नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या निसर्गरम्य मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्थान भाविकांच्या हृदयात अलगद कोरले गेले आहे. देवी भराडी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. म्हणूनच देवीच्या वार्षिकोत्सवात (जत्रेत) भक्तांचा मेळा आंगणेवाडी व्यापतो अन यात्रोत्सव लाखोंच्या गर्दीत कोकणचा महाउत्सव बनतो.

काही वर्षांपूर्वी केवळ आंगणेवाडी मर्यादित असलेला हा जत्रोत्सव आज लाखो भाविकांच्या उपस्थितीने महाराष्ट्रातील एक प्रमुख महाउत्सव बनला आहे. काही वर्षांपूर्वी भराडी देवी मंदिराभोवती असणारी यात्रा आता मंदिर परीसराच्या दोन्ही बाजूला काही किलोमीटर विस्तारली आहे. दर वर्षी यात्रेचे स्वरूप वाढत आहे, गर्दीचे रेकॉर्ड मोडत आहे.



राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार, सिने कलाकार व अन्य व्हीआयपी यांचीही गर्दी भाविकांबरोबरीने वाढतच असते. ही भक्तीची शक्ती आहे. देवीवर असलेली भाविकांची श्रद्धा आहे. विज्ञानाच्या युगातही भक्तीची शक्ती प्रचंड ऊर्जेचा स्रोत बनून श्रद्धेच्या 'तुलाभार' तराजूत वरचढ ठरते.

यात्रेत लाखोंच्या पटीत येणारा भाविक हाच यात्रौत्सवात केंद्रबिंदू असतो. भाविकांना यात्रोत्सवात सुलभ व सुखकर दर्शन मिळण्यासाठी अखंड सेवा देत यात्रा नियोजन यशस्वी करणाऱ्या आंगणे कुटुंबियांचा आदर्श देश पातळीवर घेऊन जाणारी ही यात्रा केंद्रस्थानी ठरते.

यात्रेच्या तयारीत शेवटचे दोन महिने तर आंगणे कुटुंबीय दिवस रात्र यात्रा नियोजनात गुंतलेले असतात. देवीचा भक्त हा आपलाच पाहुणा मानून प्रत्येक भाविकांचे आदरातिथ्य केले जाते. यात्रा यशस्वीतेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या आंगणे कुटुंबियांच्या सेवाभावी वृत्तीचा न आटणारा झरा जणू भराडी आईच्या हृदयातूनच वाहतो असेच या निमित्ताने म्हणावे लागेल.

हेवा वाटावा अश्या पद्धतीने यात्रेचे यशस्वी नियोजन होते. भाविकांना देवीच्या सुलभ व जलद दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा,  उड्डाणपूल उभारले जातात. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवतात. धुळीचा जराही त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात कार्पेट अंथरले जाते. उन्हापासून आबालवृद्ध महिलांना दिलासा म्हणून मंडपाची व्याप्तीही दरवर्षी वाढत जाणारी असते. मंदिरातील फुलांची आरास व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई तर लक्षवेधी असते. डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते.

देवी नवसाला पावते हा देवीचा महिमा सर्वदूर आहे. यांचमुळे दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सव भाविकांच्या गर्दीचे नवे उच्चांक गाठतो. मुंबईकर चाकरमानी यांचा लगबग व उत्साह काही वेगळाच असतो. त्यामुळे आंगणेवाडी आणि चाकरमानी असे अनोखे नाते यात्रोत्सवात असते.



आंगणे कुटुंबीय, मंडळ यासोबत ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासन शासकीय यंत्रणा, मंत्री, खासदार, आमदार सेवाभावी संस्था जणू आपलाच उत्सव आहे असे मानून यात्रा यशस्वीतेसाठी मेहनत घेतात. शासनही अधिक काही देण्याचा प्रयत्न करते. यात्रोत्सवासाठी जादा बसेस मुंबई, पुणेसह अन्य प्रांतांतून सोडल्या जातात. कोंकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या धावतात.  यात्रा परिसरात प्रशासनाकडून जादा पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, वाहतूक व्यवस्था, रस्ता रुंदीकरण करून सुलभता आणली जाते. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवात लाखो भाविकांच्या उपस्थितीने व थाटलेली दुकाने या सर्वांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. भाविकांच्या मनोकामना पूर्तीबरोबरच  व्यावसायिकांना देवी धनलक्ष्मी रूपाने प्रसन्न होते.



हौशे नवशे आणि गवशे यांच्यासाठी तर ही यात्रा खास ठरते. बच्चे कंपनीची तर यात्रेत धमाल असते. लहान थोर सर्वानाच जत्रा आपली वाटते. जत्रा सरते भाविक यात्रेतून निघतो मात्र डोळ्यात अन् मनाच्या गाभाऱ्यात देवीचे रुप अखंड ऊर्जेचा स्रोत बनून पुढील वर्षीच्या यात्रेची वाट पहते... वाट पहाते...!

अमित खोत, मालवण
9404457788

rapan bottom