आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
दिपिका देऊलकर | मालवण : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न महिला बचत गटांच्या उत्पादित मालांचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ आ. निलेश राणे यांच्या हस्ते 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्री देवी भराडी मंदिर, आंगणेवाडी येथे होणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, नाबार्ड प्रादेशिक कार्यालय पुणे, मुख्य महाप्रबंधक रश्मी दराद, सहकारी संस्था कोकण विभाग विभागीय सहनिबंधक मिलिंदसेन भालेराव, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिंधुदुर्ग उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आंगणेवाडी जत्रोत्सवानिमित्त आयोजित बचत गटांच्या उत्पादित मालांचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

