Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

लोककल्याण युवा प्रतिष्ठान वराड यांचे आदर्शवत सामाजिक कार्य

लोककल्याण युवा प्रतिष्ठान वराड यांचे आदर्शवत सामाजिक कार्य

शिवजयंती दिनी कला-क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप परब यांचे प्रेरणादायी नेतृत्व

मालवण | प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या लोककल्याण युवा प्रतिष्ठान, वराड-सिंधुदुर्ग या संस्थेने आपल्या उपक्रमांद्वारे समाजात आदर्श निर्माण केला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप परब आणि त्यांचे सहकारी यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि समाजसेवेची निस्वार्थ भावना हीच या संस्थेची खरी ताकद आहे.

मोठया उत्साहात साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवा निमित्त विशेष उपक्रम त्यांच्या वतीने राबवण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि कौशल्यवृद्धी करणाऱ्या स्पर्धांचे आयोजन श्री. वेताळ मंदिर परिसरात करण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारी निबंध स्पर्धा, संघभावना आणि खेळाडूवृत्तीला बळकटी देणारी क्रिकेट स्पर्धा, सृजनशीलतेला वाव देणारी चित्रकला स्पर्धा, संयम, स्थैर्य आणि संतुलन वाढवणारी स्लो सायकल स्पर्धा. अश्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना नवीन संधी आणि प्रेरणा मिळेल, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक दृढ होईल. असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप परब यांनी व्यक्त केला.

संदीप परब यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेने अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजहिताची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. यात जेष्ठ नागरिक भजन मंडळ – समाजातील अनुभवी, श्रद्धावान व्यक्तींना एकत्र आणणारा उपक्रम, संगीत भजन महफिल – भक्ती, कला आणि संस्कृती यांचा अनोखा संगम, शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले स्पर्धा – छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण, ज्येष्ठ नागरिक यात्रा – समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या वृद्ध व्यक्तींना आनंदाचा क्षण, दशावतारी नाटक – "वेडा चंदन" – लोककलेला प्रोत्साहन देणारा सांस्कृतिक उपक्रम, गावामधे ग्रामस्थाच्या वतीने सोमवार आठवडा बाजार सुरू करण्यात आला व स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली यामधे व्यापारी वर्गाचे बैठकीचे महत्वपूर्ण व्यवस्थापण संस्थेने केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी नेहमीच कर्तव्यपरायणता, सामाजिक बांधिलकी आणि विधायक दृष्टिकोन ठेवून कार्य केले आहे. त्यांचे नेतृत्व हे संघटन कौशल्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे लोककल्याण युवा प्रतिष्ठान आज समाजसेवेचा आदर्श बनले आहे.

संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला ग्रामस्थांचा आणि विद्यार्थीवर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला, याबद्दल संस्थेने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. भविष्यातही संस्था समाजाच्या सेवेसाठी झटत राहील आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून समाजहिताची नवी क्षितिजे गाठेल, याची खात्री आहे.

लोककल्याण युवा प्रतिष्ठानची वाटचाल समाजसेवेच्या व्रताने आणि नव्या संकल्पांनी समृद्ध होत राहो! संस्थेने समाजहिताचे नवे मापदंड प्रस्थापित करून शिखरावर पोहोचावे, हीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे.

शालेय मुलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी वराड गावचे सुपुत्र आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा. श्री. रघुनंदन घनश्याम वराडकर यांनी स्वमालकीची जागा मैदान म्हणून विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रतिष्ठानचे मा. अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शुभाष खानोलकर व श्री. अशोक परब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच,. मा. सरचिटणीस श्री. मधुकर सावंत यांनी आतापर्यंत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केले असून, भविष्यातही त्यांची वाटचाल अशीच यशस्वी राहील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोककल्याण युवा प्रतिष्ठान यशामागे मा. अध्यक्ष श्री. संदीप परब आणि मा. सरचिटणीस श्री. मधुकर सावंत यांचे नेतृत्व अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे संस्थेचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. संस्थेचे हे दोन आधारस्तंभ त्यांच्या कार्यक्षमतेमुळे प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला व्यापक लोकसहभाग आणि यश मिळत आहे.

संस्थेचे कार्यकारी मंडळही मा. अध्यक्ष आणि मा. सरचिटणीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान सामाजिक कल्याणासाठी अधिक मोठे पाऊल टाकेल असाही विश्वास यां निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

rapan bottom