Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणात  'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा जल्लोषात

मालवणात  'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा जल्लोषात

अमित खोत | मालवण : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी महाराज... अश्या गगनभेदी घोषणांनी मालवणात "जय शिवाजी, जय भारत" पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नगरी परीषद मालवण, यांचे संयुक्त विद्यमाने टोपीवाला हायस्कुल  येथे जय 'शिवाजी, जय भारत' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले राजकोट येथे पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रा कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झालटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मुख्याधिकारी संतोष जिरगे, प्रा. एम आर खोत, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.



श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देताना आमदार दीपक केसरकर म्हणाले श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना आत्मसात व्हावा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र  व राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराजांनी पहिला समुद्री किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणला बांधला. आणि आपला जिल्हा सुध्दा या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नावाने ओळखला जातो. शूरवीर श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त  “जय शिवाजी, जय भारत”पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आपण येथे एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम मालवण मध्ये घेण्याचे कारण म्हणजे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला येथे आहे. आपण सर्वजन मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झालात आणि हा कार्यक्रम यशस्वी केलात याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

फोटो : मालवणात  'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली. (अमित खोत, मालवण)

rapan bottom