प्रशालेतील विद्यार्थ्यांचे अफजलखान वध अप्रतिम सादरीकरण
संजय माने | पोईप : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जि. प. केंद्र शाळा पोईप नं.१ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यानिमित्त प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रचारातील पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपल्या मनोगत आतून विचार मांडले. प्रशालेतील कार्यक्रमानंतर विद्यार्थी पालक यांच्या प्रभात फेरीने पोईप बाजारपेठेत शिवजयंती निमित्त जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय पोईप येथे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर घोषणा देऊन कार्यक्रमात रंगत आणली.




यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अफजलखान वधावर जनजागृती कार्यक्रम सादर केला यात आरुष चव्हाण दैविक सावंत अंकित लाकम समर्थ परब विराज मालोंडकर धारेश्वर नाईक मयूर पालव सुजन पाचंगे सिद्धिविनायक नाईक व इतर विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले यावेळी पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक उपसरपंच संपदा सावंत पोईप गावप्रमुख परशुराम नाईक ग्रामपंचायत सदस्य मनाली नाईक ग्रामविकास अधिकारी श्रीमती सी पी सडविलकर शाळा समिती अध्यक्षा सोनिया चव्हाण केंद्र मुख्याध्यापक विकास घाडीगावकर सहाय्यक शिक्षिका सिद्धी परब शिक्षक प्रसाद चव्हाण प्रमोद पाटील शाळा समिती सदस्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या अफजलखान वध या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी रोख रक्कमेचे पारितोष देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विकास घाडीगावकर यांनी केले.


